पुलं म्हणजे बाई अगदी पुलं...
‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या निष्कर्षालासुद्धा आपले पोस्ट मॉडर्न देशी बंधू ‘कशावरून?’ अशा प्रश्नाची घुंगुरकाठी आपटत एक वेळ आव्हान देतील; पण ‘पुलं मोठा माणूस होता’ हे विधान ‘सूर्य पूर्वेला उगवतो’ या विधानाइतकंच बेलाशक खात्रीनं करता येईल. पुलं म्हणजे बाई (किंवा बुवा!) अगदी पुलं आहेत! हे पुलंच्या अट्टल चाहत्यांचं लाडकं विधान! हजारो वेळा ऐकू आलेलं.......